Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ एप्रिल, २०२६
Home
/
/
"नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी" वनारवाडी येथे ७ एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.
"नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी" वनारवाडी येथे ७ एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंगळवार दि.७ एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होत असून या सप्ताह काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये पहाटे चार ते सहा काकडा भजन ९ ते ११ गाथा भजन ४ ते ६ संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र कथा सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरिकीर्तन होणारा असून सप्ताह काळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरी किर्तन होणार आहे. यामध्ये ह. भ.प.राहुल महाराज पाटील (निळवंडी) ह.भ.प. दत्तात्रय महाराज जाधव (कसबे वणी) ह.भ.प.केशव महाराज भांगडे (नांदगाव) ह.भ.प. अण्णा महाराज चव्हाण (वनारवाडी) ह.भ.प. ऋषिकेश महाराज कुवटे (निफाड) ह.भ.प. नवनाथ महाराज थेटे (गिरणारे) ह.भ.प.नंदकिशोर महाराज पवार (आहेरगाव) आदींची हरिकीर्तन होणारा सप्ताह काळात सातही दिवस ह.भ.प.अण्णामहाराज चव्हाण यांचे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चरित्र कथा होणार आहे मंगळवार दि.१४ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प.सौरभ महाराज जाधव (कुंडाणे) यांचे काल्याचे किर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी या हरीकीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन वनारवाडी येथील ग्रामस्थ व भजनी मंडळाने केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा