Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२६
वलखेड येथे रात्री बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय मुलगी ठार.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात ज्ञानेश्वरी मोरे ही तीन वर्षीय बालिका ठार झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वरी मोरे ही रात्री घराबाहेर खेळत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून तिला उचलून नेले त्यानंतर तिच्या घरच्यांनी व नागरिकांनी शोधाशोध केली असता दीड तासानंतर तिचा मृतदेह सापडला.येथील शेतकरी नारायण शिंदे यांच्या मळ्यात वास्तव्यास असलेल्या मजूर कुटुंबातील ज्ञानेश्वरी ही खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला व तिला जबड्यात पकडून जवळच्या बागेत नेऊन त्याने पलायन केले. यावेळी नागरिकांनी आरडाओरडा करत शोध घेतला असता रामभाऊ बोंबले यांच्या पेरूच्या बागेत ज्ञानेश्वरीचा मृतदेह आढळून आला.
त्यामुळे या परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्यांना काय करावे असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना भेडसावत आहे संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ज्ञानेश्वरी मोरे ईच्या अचानक जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
महेंद्र लोढा :- *सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सागर मोर याच्यावर गुन्ह...
-
बापू चव्हाण दिंडोरी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा आज मुंबई येथे अत्यंत उत्साहप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा