Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२६
पालखेड बंधारा जी.प.शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप.
दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा जि.प.प्राथमिक मॉडेल शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बापू (तात्या) चव्हाण हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच बबलू गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामनाथ पिठे,उपाध्यक्ष लहानु वाघ,सदस्य धनराज महाले,संदिप पिठे उपस्थित होते.
प्रथमता बापू (तात्या) चव्हाण यांनी व मान्यवरांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी भाषण,व कविता सादर करून उपस्थितांची मन जिंकले.यावेळी विद्यार्थ्यांनी व वर्गशिक्षक संजय सोनवणे,गोविंद ढेपले यांना तसेच शिक्षक प्रशांत विसपुते,शिवाजी भोसले,दिलीप झुरडे,अमोल पवार,रविंद्र काकुळते, प्रशांत उन्हवणे,प्रदिप सावंत,ज्ञानेश्वर वायाळ वैशाली वाघेरे,कल्पना महाले यांना भेटवस्तू दिली.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. “शिस्त,मेहनत आणि चिकाटी यामुळेच यश मिळते,”असे मार्गदर्शनपर विचार व्यक्त करण्यात आले.शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठीची तळमळ आणि एकमेकांशी जोडलेले नाते आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले.सर्व विद्यार्थी आज असलेल्या सर्व सुख सुविधांचा लाभ घेत चांगले शिक्षण घेऊ शकतात.ते घ्या आणि उंच भरारी घ्या असे अध्यक्षीय मनोगत बापू (तात्या) चव्हाण यांनी व्यक्त केले.
सर्व विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत गावाचे शाळेचे नावलौकिक वाढवा असे प्रतिपादन मुख्याध्यापक खैरनार यांनी मांडून कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्यात आला.शिक्षक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात निरोप घेताना अश्रू दाटून आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी पगार तर आभार स्वरा सोनवणे हिने मानले.यावेळी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा