Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ एप्रिल, २०२६
तरुण गर्जना वृत्ताची दखल, वन विभागाच्यावतीने पालखेड कॉलनी परिसरात पिंजरा दाखल.
तरुण गर्जना वृत्ताची दखल,
बापू चव्हाण दिंडोरी :-
दिंडोरी तालुक्यातील पालखेड कॉलनी येथील शेतकरी चंद्रकांत सोनवणे यांच्या घराजवळ बांधलेल्या वासरीवर बिबट्याने आज बुधवार दि.१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास हल्ला करून वासरीला मारून टाकल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण यांनी वन विभागाशी संपर्क साधून या वासरीचा पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. याबाबत वनविभागाचे पदाधिकारी कर्मचारी यांनी त्वरित दखल घेऊन या वासरीचा पंचनामा करून या परिसरात तात्काळ पिंजरा लावण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण व येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी वन विभागाचे वनरक्षक योगेश दळवी, वाहन चालक बापू शिरसाठ,सचिन गांगोडे,कुशाल गांगुर्डे,यांच्यासह पिंटू सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा