Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल, वणी विद्यालयातील कु.तेजस महेंद्र झोटिंग या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय,खेडगाव येथे निवड.
कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल, वणी विद्यालयातील कु.तेजस महेंद्र झोटिंग या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय,खेडगाव येथे निवड.
स्कॉलरशिप एन एम एम एस या सारख्या परीक्षेत विद्यार्थी चांगले यश मिळवतात.ही परंपरा विद्यालयाने या वर्षी पण जपली आहे.
नियमित वर्षभर जादा तास घेवून जास्तीत जास्त सराव पेपर घेतले जातात,मार्गदर्शन केले जाते. म्हणजे भविष्यात स्पर्धा परीक्षेत हे विद्यार्थी यशस्वी होवून एक शिस्तप्रिय, गुणवान अधिकारी बनतील. हा उद्देश आहे.आतापर्यंत दिंडोरी तालुक्यातून सर्वात जास्त विद्यार्थी वणी शाळेचे आहेत. हीअत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. या विद्यालयातून जवळपास ४०-५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची खेडगाव नवोदय विद्यालयात निवड होवून आज वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत सदरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून शिक्षक गुलाब तुंगार, गोबाले, श्रीमती एस.जी.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे ,दिंडोरी-पेठ तालुका संचालक प्रवीण नाना जाधव व स्कूल कमिटी अध्यक्ष संपतराव (अण्णा) घडवजे, सदस्य किसनराव मोरे राजेंद्र देशमुख, राजाभाऊ देशमुख,सर्व स्कूल कमिटी सदस्य, विद्यालयाचे lमुख्याध्यापक डी .बी.पाटील, उपमुख्याध्यापक निकम आर.व्ही,पर्यवेक्षक पि .एन. चकोर व एस.टी. इंगळे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा