Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
५२ हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात; शिक्षक दाम्पत्याच्या थकीत देयकासाठी मागितली रक्कम!
५२ हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात; शिक्षक दाम्पत्याच्या थकीत देयकासाठी मागितली रक्कम!
नाशिक (दिंडोरी) शिक्षक दाम्पत्याच्या वेतनश्रेणी फरकाच्या थकीत देयकासाठी प्रस्ताव मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गटशिक्षणाधिकारी, एक प्राथमिक शिक्षक आणि जिल्हा परिषदेत कार्यरत कनिष्ठ लेखा अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
या कारवाईत दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (४८), प्राथमिक शिक्षक नीलेश निंबा भारती (५०) आणि नाशिक जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी देविप्रसाद चैत्राम पाटील (५०) यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार व त्यांची पत्नी हे दोघेही शिक्षक असून ‘पेसा’ विशेष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी २००२ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील एकस्तर वेतनश्रेणी फरकाच्या थकीत रकमेचा प्रस्ताव दिंडोरी पंचायत समितीकडे सादर केला होता. या प्रस्तावानुसार तक्रारदारास सुमारे ६.५७ लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीला ६.५५ लाख रुपये देय होते.
मात्र, हे देयक मंजूर करून वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी करण्यात आली. सुरुवातीला अधिक टक्केवारीची मागणी करण्यात आली होती, मात्र नंतर ती कमी करून ठराविक रक्कम स्वीकारण्याचे ठरविण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या या कृत्यामुळे शिक्षण विभागात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा