Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२६

पत्रकार संजय थेटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.




बापू चव्हाण दिंडोरी

पत्रकार क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे तसेच उमराळे बुद्रुक परिसरात पत्रकार क्षेत्राबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथील रहिवाशी संजय थेटे याचे कुटुंबासमवेत जेजुरी येथे दर्शनासाठी जात असताना गडाच्या पाहिल्या पायरीवरचा ऋदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याने उमराळे परिसर शोककळेत बुडाला आहे,
  याबाबत माहिती अशी की, उमराळे बु.येथील रहिवाशी तसेच पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार संजय थेटे याचे कुटुंबसमवेत जेजुरी येथे दर्शनाला गेले होते.गडावर चढताना पहिल्याच पायरीवर त्यांना ऋदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.गावातील व परिसरातील लोक त्यांना आवडीने संजू नावाने हाक मारीत त्यांचा उमराळे गावात मोठे वर्चस्व होते, त्यांना लहान पनापासून फोटो काढण्याची हौस व छंद असल्याने त्यांचे उमराळे बु.येथे एक फोटो दालन त्यांनी उभे केले होते, परिसरातील गोरगरीब असो की श्रीमंत नेहमी सबका भला हो अशाच विचाराचे असल्याने त्यांनी उमराळे परिसरात कित्येक विद्यार्थी व वयोवृद्धाचे फोटो हे मोफत काढून दिले आहे. याशिवाय त्यांचे तालुक्यातील सर्व पत्रकारांबरोबर सलोख्याचे त्यांचे संबंध होते. गेल्या कित्येक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी दिंडोरी पश्चिम भागामध्ये आपल्या कामाचा ठसा ठेवला होता.सतत हसतमुख असल्याने त्यामुळे आजही त्यांची ओळख टिकून होती.नासिक पेठ गुजरात रस्त्यावर कोणत्याही वेळी अपघात झाल्यावर संजय थेटे हे पोलिसांना वेळेवर माहिती देऊन अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावत होते.त्यांचा जन्म हा चाचडगाव येथे झाला असून संजू...नावाचा आज आवाज थांबल्याने त्यांच्या अशा अचानक जाण्याने उमराळे व चाचडगाव परिसरात तसेच दिंडोरी तालुक्यातील पत्रकारांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे, त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध