Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ एप्रिल, २०२६
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने लोणी बु येथे भुमीपुजन सोहळा उत्याहात संपन्न.
सखाराम महाराज लोणी बु, ता. रिसोड जि. वाशीम रविवार रोजी सखाराम महाराज लोणी बु ता. रिसोड येथे जिवन दिप अनाथ आश्रम व वृध्दाश्रम व प्रेरणा महिला गृह उद्योग समुह तसेच सयाजीराजे गायकवाड मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेअंतर्गत सुतगिरणीचे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने हा सोहळा संपन्न आनंदमय वातावरणात पार पडला, ही माझ्यासाठी माझ्या सहकार्यासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. सखाराम महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी भविष्यात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तसेच युवक युवती महिला पुरूष यांच्या रोजगारासाठी एक महत्वपूर्ण केंद्र ठरेल, आणी अनाथ मुला मुलीसाठी तसेच बेघर बेवारस वयवृध्द आणी विधवा विधूर महिलायांच्या संगोपनासाठी आम्ही कटिबध्द राहु, महिलांना गृह उद्योगा मार्फत रोजगार उपलब्ध करूण देऊ असा विश्वास आहे. या आनंदमय प्रसंगी कुणाल माने, प्रविण सरदार, गौतम नरवाडे, संदिप राऊत, आकाश इंगोले, कपिल इंगोले, पंडीत इंगोले, गौतम इंगोले, विनोद इंगोले, अशोक इंगोले आदी गावातील मान्यवर, ग्रामस्थ बांधव, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर (प्रतिनिधी) शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा