Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

दिंडोरी येथे विद्यार्थी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी.




बापू चव्हाण दिंडोरी

         आज महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेकडून प्रांत कार्यालय येथे संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे यांच्या अध्यक्षतेखाली गोविंद वैष्णव यांना निवेदन देण्यात आले.
        यामध्ये दिंडोरी येथे झालेल्या रस्ता अपघातात जे ९ बळी गेले होते त्यात ६ विद्यार्थी देखील समाविष्ट होते.त्याचे मुख्य कारण हे चुकीचा रस्ता बांधणी हे कारण समोर येत आहे. या रस्त्यास परवानगी देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा तसेच विद्यार्थी सुरक्षा प्रश्न देखील अधोरेखित केला गेला. त्यामध्ये अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये सिसिटीव्ही कॅमेरे तात्काळ बसवावे, कोणत्याही खाजगी,सरकारी शैक्षणिक संस्थांनी रात्रीच्या वेळेस कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नाही,स्कुल बस मध्ये महिला असिस्टंट असाव्यात,शाळेत अनोळखी व्यक्तीस ओळख पत्राशिवाय प्रवेश देऊ नये. विदयार्थ्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी सखी सावित्री किंवा विशाखा समिती सक्रिय असावी या मागण्या करण्यात आल्या नाही तर लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. 
       या प्रसंगी विद्यार्थी संघटनेचे नितीन बोढारे,दत्तात्रय शिंदे,निकेतन जाधव,रमेश गांगुर्डे,राहुल पवार, सात्विक पगारे,कुणाल जगताप उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध