Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ एप्रिल, २०२६
खासदार भास्कर भगरे म्हणाले — शिक्षणाला प्राधान्य जानोरी जि.प.शाळेत भूमिपूजन सोहळा संपन्न.
दिंडोरी ( प्रतिनिधी)
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शौचालय बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.शिक्षण क्षेत्रातील मूलभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी बोलताना खासदार भगरे म्हणाले की, “ज्ञान मंदिरे सक्षम करणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. जानोरी शाळेची गरज लक्षात घेऊन शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.” तसेच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव काठे होते.प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक प्रवीणनाना जाधव,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,केंद्रप्रमुख विजय निकम, महात्मा फुले विद्यालयाचे स्कूल कमेटी चेअरमन शंकरराव वाघ, माजी पोलीस पाटील सुरेश घुमरे, माजी उपसरपंच विष्णुपंत काठे,छबु मटाले,पराग भगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शंकरराव वाघ यांनी खासदार भगरे यांनी संसदेत जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे मांडत उत्कृष्ट भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.तसेच संदिप गुंजाळ यांनी शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करत भविष्यातही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमास सरपंच सुभाष नेहरे,उपसरपंच हर्षल काठे, ग्रामपंचायत अधिकारी नानाभाऊ खांडेकर,ग्रामपंचायत सदस्य विलास काठे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दिपक काठे,माजी सरपंच किशोर जाधव,श्रीनिवास नर्सरीचे डी. बी.काठे,अशोक केंग,अनिल आहेर, राहुल रोंगटे,किरण मांडवे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका लीना गोसावी तसेच उपशिक्षक कैलास चित्ते,श्रीम. बहिरम,प्रतिभा बागुल,प्रविण वराडे, सुनंदा गवंडे,पूजा उघडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जेष्ठ शिक्षक राजेंद्र खैरनार यांनी केले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
महेंद्र लोढा :- *सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सागर मोर याच्यावर गुन्ह...
-
बापू चव्हाण दिंडोरी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा आज मुंबई येथे अत्यंत उत्साहप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा