Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

बबनराव चौधरी यांची भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा प्रभारीपदी निवड



शिरपुर प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी दि. 21 एप्रिल 2026 रोजी जिल्हा प्रभारी यांची निवड जाहिर केली असुन त्यात नंदुरबार भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारीपदी बबनराव चौधरी (शिरपुर) यांची नियुक्ती जाहिर केली आहे. हि नियुक्ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने ‘नंदुरबार जिल्हा प्रभारी’पदी करण्यात आली आहे. 

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, ही जबाबदारी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याची, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवण्याची आणि जनते पर्यंत विकासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याची महत्त्वाची संधी आहे. आपल्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास असल्याचे म्हटले आहे. बबनराव चौधरी हे गेल्या 46  वर्षापासुन भारतीय जनता पार्टीत काम करीत आहेत. त्यांनी 6  एप्रिल 1980 मध्ये भाजपा स्थापना दिवशी मुंबईत सहभाग घेतला होता. बबनराव चौधरी यांनी पक्षात 46 वर्षात विविध जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. धुऴे भाजपा जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रदेश उपाध्यक्ष अश्या अनेक पदांवर काम केले आहे. यापुर्वी 2021 ते 2023 प्रदेश उपाध्यक्ष म्हणुन काम करीत असतांना नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणुन यशस्वी जबाबदारी संभाऴली होती. आता परत भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी त्यांचावर नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणुन जबाबदारी सोपवली आहे. बबनराव चौधरी यांची या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध