Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ एप्रिल, २०२६
सोमवारी चिंचखेड ला इंदुरीकर महाराजांचे जाहीर हरिकीर्तन.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री कानिफनाथ महाराज उत्सव ओम चैतन्य गोरक्षनाथ प्रकट दिन निमित्ताने दोन दिवसीय यात्रोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात चिंचखेड कानिफनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ झेंडफळे यांनी माहिती दिली आहे.
सोमवार १३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ वाजता चिंचखेड गावात कानिफनाथ पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच दुपारी बारा वाजता पाद्य पूजा होम हवन व महाआरती, तसेच रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. मंगळवार १४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प रमेश महाराज सोनवणे उंबरखेड यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तसेच दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि रात्री ८ ते १० वा. शाहीर किसन पीठे चापडगावकर यांचे नाथभक्तीपर गायन व रहाडी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यात्रोत्सवाचा चिंचखेड तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन चिंचखेड कानिफनाथ महाराज मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ झेंडफळे,यांच्यासह मंदिर कमिटीने केले आहे..
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा