Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ मे, २०२६

दिंडोरीत महाराष्ट्र दिन शहिदांचे स्मरण करून साजरा.




बापू चव्हाण दिंडोरी  

         दिंडोरी येथे ६६ वा महाराष्ट्र स्वातंत्र्य दिन शहिदांना स्मरण करून साजरा करण्यात आला.यावेळी
दिंडोरी तालुका माजी सैनिक परिवाराच्यावतीने आज शहीद प्रसाद शिरसागर यांच्या स्मारकावर जाऊन मानवंदना दिली.शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या प्रतिमेस वीरमाता मंजुषा क्षीरसागर व सौ. आरोग्य सेविका कौशल्य गांगुर्डे यांनी पूजन करून पुष्पांजली अर्पण केली.
      यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य विभाग दिंडोरी उपकेंद्र २ च्या आरोग्य सेविका श्रीमती कौशल्या गांगुर्डे ह्या होत्या.यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आजच्या महाराष्ट्र दिना पाठीमागे शहिदांचे बलिदान स्मरण करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे कर्तव्य आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आजचा आनंद उत्सव आपण साजरा करत आहोत.
       यावेळी माजी सैनिक संघटना अध्यक्ष भारत खांदवे यांनी कामगार दिन व बुद्ध पौर्णिमाचे महत्त्व सांगितले.ज्येष्ठ माजी सैनिक गणपत जाधव,शांताराम जाधव,मोहन सोमवंशी, दत्तात्रय जाधव विलास जाधव,कविता बैरागी,सुनंदा निरगुडे तसेच श्रीमती रोशनी भदाणे,श्रीमती सविता कोल्हे,खेमचंद पवार , श्रीमती कल्पना पगारे,सोनाली वारे आदींसह माजी सैनिक परीवार सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे व्यवस्थापन डि.जे.फलटन अकेडमी संचालक राहुल पगार व विद्यार्थ्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध