Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ मे, २०२६

सिन्नर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा सिन्नर पोलीसांनी केला गजाआड ०५ गुन्हे उघडकीस.



 माधव खाबिया :-
सिन्नर शहर, सिन्नर तालुका परिसरात तसेच नाशिक जिल्हयात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी नाशिक ग्रामीण हददीत दररोज नाकाबंदी आयोजित करून संशयित मोटारसायकलीचे कागदपत्रे तपासणी करणे बाबत सुचना दिलेल्या आहे. त्याप्रमाणे सिन्नर पोलीस स्टेशन कडील पोनि हेमंतकुमार भामरे यांचे आदेशानुसार सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने दि२९/०४/२०२६ रोजी सायंकाळी सिन्नर शहरातील सरदवाडी रोड परिसरात अचानक नाकाबंदी करून संशयित वाहणांची तपासणी करत असतांना सरदवाडी बाजुकडून एक ईसम काळे रंगाचे विनाक्रमांकाचे स्प्लेंडर मोटारसायकलवर येत असतांना दिसल्याने गुन्हे शोध पथकाने त्यास थांबवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव करण रामशरण शर्मा वय ३२ वर्ष'रा. सहवास नगर, कालीका माता मंदीराचे पाठीमागे, मुंबईनाका नाशिक असे सांगितले तेव्हा त्याचेकडेस असलेल्या विनाकंमाकाचे मोटारसायकल बाबत विचारले असता त्याने उडवाडवीचे उत्तरे दिल्याने त्यास पोलीस ठाणेत आणुन त्याचेकडेस सखोल चौकशी केली असता त्याने सदरची स्प्लेंडर मोटारसायकल ही अडसरे खुर्द ता ईगतपुरी जि नाशिक येथुन काही दिवंसापुर्वी चोरी केलेली असल्याचे सांगितले तेव्हा ताब्यात असलेल्या ईसमाबाबत अभिलेख तपासला असता सदरचा इसम हा रेकॉर्डवरील सराईत मोटारसायकल बोर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडेस अधिक चौकशी केल्याने त्याने घोटी, ओझर, सिन्नर, मुंबईनाका परिसर, नाशिक शहर परिसरातुन मोटारसायकल चोरी केलेल्या असल्याचे कबुली दिली त्याचेकडुन ०२ स्प्लेंडर, ०२ पॅशन, ०१ हिरो युनिकॉर्न मोटारसायकल एकुन २,००,०००/-रू किंमतीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहे.सदरचे कारवाईत सिन्नर पोलिस स्टेशनकडील ०१, घोटी पोस्टे ०१, ओझर पोस्टे ०२, मुंबईनाका पोस्टे नाशिक शहर ०१ असे एकुन ०५ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे. यातील अटक आरोपी करण रामशरण शर्मा वय - ३२ वर्ष'रा. सहवास नगर, कालीका माता मंदीराचे पाठीमागे, मुंबईनाका नाशिक याचेवर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाणेत दरोडा, जबरी चोरी, मोटारसायकल चोरी असे गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई बाळासाहेब पाटील पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण, अदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण, कांतीलाल पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड उपविभाग, निफाड यांचे मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांचेकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार समाधान बोराडे, नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, आप्पासाहेब काकड, यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा/राजु मोरे हे करीत आहेत.
सिन्नर पोलीस ठाणे येथे दि३०/०४/२०२६ रोजी पावेतो मिळुण आलेल्या मोटारसायकल अ.क वाहण क्रं चेसिज क्रं,ईजीन क्रं,पोलीस ठाणे खालीलप्रमाणे,MH1SHL4009,MBLHAW114L5M09118,HA11EVLSM59973,
घोटी पोस्टे । १२७/२०२६ भान्यासं ३०३ (२) MH15EQ6272
MBLHA1013EHH02518
HA10ELEHH33057,सिन्नर पोस्टे १३३१/२०२६,भान्यासं ३०३(२),३ MH15EW3932

MBLHA108JFHC78790

HA10ETFHC06549,
ओझर पोस्टे 1०४/२०२५ भान्यासं ३०३(२),४ MH15CB2328
MBLHA10EL8GB02910
HA10EB86805476,
ओझर पोस्टे । १२४/२०२५ भान्यासं ३०३(२),५ MH15EJ1514
ME4KC09CKD8597356,KC09E86606918
,मुंबईनाका पोस्टे नाशिक शहर ११४१/२०२५ असे असून ज्यांच्या असतील त्यांनी सदरील पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध