नाशिक जिल्हा प्रतिनिधी :-तक्रारदार मनोज मधुकर वाघमारे रा.शीतलामाता नगर मालेगाव कॅम्प व जमशीद अहमद जलालुद्दीन रा. रमजानपुरा द्याने यांनी शिवाजी नगर मध्ये असलेल्या करवा हॉस्पिटल च्या पाठीमागे मोरया मॉल जवळ असलेल्या संता इंग्लिश मिडीयम स्कुल मालेगाव यांच्या विरुद्ध म्हणजेच संता इंग्लिश मिडयम स्कुल ने बेकायदेशीर शाळा संचालन, बनावट शैक्षणिक नोंदी व यु डी आय एस ई (UDISE) क्रमांकाचा गैरवापर,, बेकायदेशीर व्यवहार, नवीन परवानगी साठी नियंमबाह्य प्रयत्न तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक आर्थिक दुर्लक्ष व मिली भगती बाबत शालेय संबंधित असलेल्या संबंधिताविरोधात गुन्हा नोंद करण्याबाबाबत आशयाची तक्रारदराने तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात केली आहे सदरील बाब गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिसांनी स्वतः तानाजी कारभारी घोंगडे शिक्षण विस्तार अधिकारी (ए. ओ.) पंचायत समिती मालेगाव, अतिरिक्त कार्य. प्रशासन अधिकारी महानगर पालिका मालेगाव यांची चौकशी करत प्रश्न उत्तर स्वरूपात प्रती दोन जबाब पोलिसांनी घेतले, उमा सनी मोदी मुख्याध्यापिका तथा संस्थापक संतान्स इंटरनॅशनल किड्स इंग्लिश मिडीयम स्कुल, नितीन वसंतराव चौधरी, संस्थापक मानव इग्लीश मिडीयम स्कुल मालेगाव,राणु अमित लोया, मुध्याध्यापिका तथा संस्थापक सांता किड्स इंग्लिश मिडीयम स्कुल, पंकज आनंद, डायरेक्टर ऑफ द संता किड्स फ्रँचायझी, जयपुर, अनिल मधुकर बाविस्कर (पालक), श्री. मनोज अशोक जगताप (पालक) यांचेही जाब जवाब पोलिसांनी घेतले होते.सदर चौकशी अंति संतान्स किड्स स्कूल, चे पदाधिकारी ट्रस्ट पदाधिकारी,सदस्य, १) अध्यक्ष उमा सणी मोदी २) उपाध्यक्ष आनंदा काबरा ३) सचिव सनी महेंद्र मोदी, ४) खनिजदार महेंद्र मोदी, ५) सदस्य सतिश कासलीवाल ६) सदस्य संदिप केजरीवाल, ७) सदस्य शोभित मोदी यांनी सदर शाळा (इयत्ता ०१ पासुन पुढील वर्ग) ही अनाधिकृतपणे सुरु ठेवलेली असुन सदरहू शाळेत अनधिकृतपणे वर्ग सुरु ठेवलेले आहेत व सदर विद्यार्थी व पालक यांची दिशाभूल करुन त्यांच्याकडुन मोठ्या प्रमाणात फि वसुल करुन आर्थीक पिळवणुक केल्याचे पोलीस चौकशीत निदर्शनास आले आहे. बाबतचा अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प उपविभाग मालेगाव यांनी . अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांना सादर केला असता त्यांनी सदर शाळे विरुध्द गुन्हा दाखल करण्याची कॅम्प उपविभाग मालेगाव यांचेकडील दिनांक १५/०४/२०२६ रोजीचे पत्रा अन्वये परवानगी दिलेली आहे.
याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक- संकिर्ण / २००९ (९१३/०९) माशि-०१/मंत्रालय मुंबई- ३२दिनांक १९ जुन २०१० अन्वये सदर शाळा ३० जून नंतर देखील बंद न करता सुरु ठेवून शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने शिक्षण अधिकारी प्राथमीक जिल्हा परीषद नाशिक यांच्या कार्यालकडील जावक क्रमांक शिक्षण/प्राथ-८/ १२३० ते १२४७ /२०२५ दिनांक ०३/१०/२०२५ अन्वयेच्या आदेशा नुसार सदर शाळे विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करणे साठी प्रशासन अधिकारी महानगरपालीका मालेगाव यांना प्राधीकृत केले आहे. सदर आदेशाच्या आधिन राहुन प्रशासन अधिकारी यांनी तात्काळ कॅम्प पोलीस ठाणेस सदर शाळे विरुध्द फिर्याद देणेकामी उपस्थित रहावे. असे पत्र कॅम्प उपविभाग मालेगाव यांनी काढले असूनही प्रशासन सुस्त का ❓ अशी नागरिक व पालक यांची दबक्या आवाजात चर्चा आहे गटशिक्षण विस्तार अधिकारी तानाजी घोंगडे यांना विचारणा केली असता ते महानगर पालिका प्रशासन अधिकारी यांच्याकडे बोट दाखवतात महानगर प्रशासन अधिकारी यांना विचारणा केली असता ते स्पस्ट सांगतात कि मी तानाजी घोंगडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि माझे आणि पोलीस निरीक्षण पंकज निकम यांचेशी सर्व बोलणं झालं परंतु काय सर्व बोलले हे घोंगडे यांनी गुलस्त्यात ठेवले का ❓याच बाबत पोलीस निरीक्षक यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिले कि शिक्षण विस्तार अधिकारी यांनी माझ्याकडे शुक्रवार पर्यंत मुदत मागितली परंतु घोंगडे हे उपस्थित राहिले नाही संशयात्मक मूळ नेमके कुठे यांच्यावर राजकीय दबाव आहे कि काय नेमका गुन्हा दाखल न होण्याचे कारण काय प्रश्न अनेक उत्तर मात्र एकच परंतु तेच अपेक्षित उत्तर देण्यास प्रशासन अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसते.
*चौकट*
*माझ्याकडे तक्रार आल्या नंतर वरिष्ठाच्या मार्गदर्शन व सूचनानुसार कॅम्प उपविभाग मालेगाव सहाय्यक पोलीस अधिक्षक कॅम्प उपविभाग मालेगाव यांचे पत्राच्या अनुषंगाने संतान्स इंटरनॅशन इंग्लिश स्कुल या शाळेवर कायदेशीर कारवाई होणेकामी फिर्याद देण्यासाठी मी वेळोवेळी शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी घोंगडे यांना पोलीस स्टेशनं ला बोलवलं परंतु त्यांनी मला सांगितले कि शुक्रवार दिनांक ०९/०५/२०२६ पर्यंत मुदत मिळावी त्यानंतर मी पोलीस स्टेशनला येईल - पंकज निकम पोलीस निरीक्षक मालेगाव कॅम्प*
*२) पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर तात्काळ ए ओ यांना शासनाने नियुक्त केले सर्व मजकूरातील बाबी कायदेशीर आहेत का हे बघण्यासाठी ए. ओ. यांना कळविण्यात आले होते त्यावेळी ए. ओ. यांनी थोडी मुदत मागितली कायदेशीर कारवाई होणार - प्रशासकीय अधिकारी मालेगाव*
३) संतान्स इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम शाळेवर वरिष्ठाणचे मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करणार.- तानाजी घोंगडे (ए. ओ. शिक्षण विस्तार अधिकारी )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा