Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १० मे, २०२६

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वणी येथे “बहुजन हक्क निर्धार परिषद”* आयोजित.



वणी, ( दिंडोरी ): प्रतिनिधी 

वंचित बहुजन आघाडी, दिंडोरी तालुक्याच्या वतीने शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता वणी येथील खुशी बँक्वेट हॉल येथे “बहुजन हक्क निर्धार परिषद” आयोजित करण्यात आली आहे. सद्याच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीत बहुजन समाजासमोरील प्रश्नांवर चर्चा करून समाजामध्ये जागृती निर्माण करणे हा या परिषदेमागील मुख्य उद्देश आहे.देशातील आदिवासी, बौद्ध, मुस्लिम तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सामाजिक न्याय, संविधानिक हक्क, शिक्षण, रोजगार, आरक्षण, सांस्कृतिक अस्मिता आणि बहुजन एकजूट या विषयांवर परिषदेत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा. सुजात आंबेडकर उपस्थित राहणार असून ते बहुजन समाजाच्या राजकीय आणि सामाजिक दिशेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कार्यक्रमास राज्य प्रवक्ता दिशा पिंकी शेख, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सभेबाबत बोलतांना युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे यांनी "संविधानाचे रक्षण, सामाजिक न्यायाची बाजू मजबूत करण्यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे म्हटले आहे. तसेच बहुजनाची मूठ बांधून जिल्हा परिषद -पंचायत समितीत आम्ही लोकशाहीमुलक नव्या राजकारणाची ओळख तालुक्याला करून देऊ!" असे प्रतिपादन केले.
दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील युवा कार्यकर्ते, महिला आघाडी, सामाजिक संघटना आणि बहुजन विचारांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत अहिरे, युवा महासचिव विकी दुर्धवळे, शहराध्यक्ष तुषार मोरे,उपाध्यक्ष संकेत गांगुर्डे, समाधान शिरसाठ, विशाल गांगुर्डे, दादा मोरे आदी.
आयोजकांच्या वतीने वणी, दिंडोरी तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिषद यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध