Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० मे, २०२६
जळगाव PWD हादरले ! १५ लाखांची मागणी; ५ लाख स्वीकारताना अभियंता रंगेहाथ पकडला
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अहिरे यांना १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी, त्यातील ५ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे संपूर्ण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका ठेकेदाराचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोठे बिल प्रलंबित होते. संबंधित बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी तब्बल १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश अहिरे यांना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईनंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वीही विभागातील विविध कामांमध्ये गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप होत आले आहेत. त्यामुळे या घटनेने विभागाच्या प्रतिमेला आणखी धक्का बसला आहे.
दरम्यान, या प्रकरणात केवळ शाखा अभियंताच नव्हे तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असू शकतो, अशी चर्चा विभागात सुरू झाली आहे. त्यामुळे एसीबीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण साखळी उघड करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईमुळे सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचाराविरोधात कठोर संदेश गेला असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा