Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २० मे, २०२६

भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा.



संदीप अवधूत :-
भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला असता दिंडोरी तालुका येथे जाहीर मोर्चाचे आयोजन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापुरकर यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गुलाब थेटे यांच्या अध्यक्षतेखाली संजय दोंदे महाराष्ट्र उपाध्यक्ष, योगेश ननावरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन नुसार दिंडोरी तहसील कार्यालय येथे दारूबंदी तसेच तहसील कार्यालय कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी,ग्रामसेवक, तलाठी, हे गावावर राहत नाहीत म्हणून जनतेला मोठ्या समस्येला सामोर जावे लागते. अवैध व्यवसाय, तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध न होणाऱ्या शासकीय सुविधा तलाठी सजावर राहत नसल्या बाबत तसेच गावोंगावी पाण्याची टंचाई शैक्षणिक बाबी इत्यादी अशा विविध मागण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी लातूर, अमरावती,धुळे, जळगाव मुंबई येवला, संभाजीनगर, धाराशिव पुणे, परभणी अशा विविध भागातील पदाधिकारी उपास्थित असून युवा नेते पृथ्वीराज पाटील, अनिलभाऊ देसले, सुनील जाधव ,राणीताई राणे, देसले , सनाताई शेख, दीपक मंडलिक, निर्मलाताई लोणारे,उपस्थित होते सदर मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून ग्रामीण अध्यक्ष गुलाबराव थेटे ,तालुकाध्यक्ष प्रवीण गवारे ,संपर्कप्रमुख संजय बाबा गवारे ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेशभाई ननावरे व महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय दोंदे माधव खाबिया सुरेश सुराशे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप अवधूत  सर्व सहकारी यांनी प्रामाणिक काम केले असून मोर्च्याची सुरुवात मातोश्री कृषी पर्यटन निळवंडी रोड या ठिकाणावरून सूरू झाली असून प्रथमता महाराष्ट्र राज्याचे स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय संविधानाचे जनक महापुरुष परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून मोर्च्याला सुरुवात झाली असून तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देऊन सर्व मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या अशी विनंती अखिल भारतीय संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सह सर्व जिल्हा, तालुका, राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध