Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० मे, २०२६
Home
/
/
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांचा रिपाई (आठवले) गटात पक्षप्रवेश व संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून पाठिंबा जाहीर.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांचा रिपाई (आठवले) गटात पक्षप्रवेश व संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून पाठिंबा जाहीर.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतर पक्षांचा पक्षप्रवेश सोहळा दणक्यात सुरू असताना आता रिपाई आठवले गट सुद्धा यामध्ये आघाडीवर आहे. सामाजिक न्याय विभाग भारत सरकार मंत्री मोहदय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिनांक 18 मे रोजी नागपुर रविभवन येथे आण्णासाहेब मुळे, भाई दिलीप खरात यांच्यावर विश्वास ठेवुन संदिपभाऊ गवई यांनी रिपाई आठवले गटात पक्षप्रवेश केला. संदिपभाऊ गवई हे नेहमीच गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतात. यावेळी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये सामाजिक न्याय विभाग भारत सरकार मंत्री मोहदय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पक्षप्रवेश व महाराष्ट्र राज्यातुन जाहिर पाठिंबा दिला त्यामुळे महाराष्ट्र राज्यात विशेषत्वाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये रिपाई आठवले पक्षाची ताकद आता वाढणार आहे. नावलौकिक असलेले युवा तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे युवा नेते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी रिपाई आठवले गटात
पक्षप्रवेश व संपुर्ण महाराष्ट्र राज्यातुन पाठिंबा जाहीर केला आहे. तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून आपले जाळे उभे केले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर पातळीवर सामाजिक उपक्रम विविध ठिकाणी घेत आसतात यामुळे मोठ्या संख्येने युवक युवती व पुरुष व महिला तथागत ग्रुपमध्ये सहभागी होत आसतात. याचाच फायदा नक्कीच पक्षाची ताकद वाढण्यासाठी होईल. त्यांच्या समवेत आण्णासाहेब मुळे, भाई दिलीप खरात, दिलीप काकडे, शरद अंभोरे, पवन साळवे, आकाश साळवे, सुधीर हिवाळे, कुणाल माने, आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपाई आठवले गटामध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत नागपुर रविभवन येथे पक्ष प्रवेश केला आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर आज एका थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने हादरून गेले आहे. महावीर सोसायटी परिसरात घडलेल्या या ...
-
माधव खाबिया :- मेहकर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा