Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २३ मे, २०२६

मालेगाव शहरात चोरीच्या आणखी ०७ मोटर सायकल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.


संदीप अवधूत :-

नाशिक ग्रामीण जिल्हयातील मालेगाव शहरासह नजीकचे तालुक्यांमध्ये मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे मालेगाव शहरातील नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहरातील मोसम पुल परिसरात दोन संशयीत चोरीची मोटर सायकल घेवुन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून स्थागुशाचे पोलीस पथकाने मोसमपुल परिसरात सापळा रचून खालील दोन संशयीतांना ताब्यात घेतले.१) साद मोहमद इफान, वय २४, रा. रजा चौक, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक २) मोमीन मोहमद दानिश, वय १९, रा. रमजानपुरा, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक वरील दोन्ही संशयीतांचे कब्जात मिळून आलेल्या हिरो पेंशन प्रो मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटर सायकल ही, नया इस्लामपुरा या ठिकाणाहून चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर मोटर सायकल बाबत खात्री केली असता, आयशानगर पोलीस स्टेशन गुरनं ७३/२०२६ भा.न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.वरील दोन्ही संशयीतांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी व त्यांचे खालील दोन साथीदार अशांनी मिळून मालेगाव शहरातील विविध ठिकाणांवरून आणखी काही मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. ३) हमजा इस्तियाक अहमद, वय २०, रा. मौलाना उमरेन चौक, गुलाबपार्क, मालेगाव, जि. नाशिक ४) सय्यद इजाज सय्यद यासीन, वय १९, रा. नवीन फरान मागे, गुलाबपार्क, मालेगाव, जि. नाशिक यातील ताब्यात घेतलेले वरील चारही संशयीतांकडे वरील गुन्हयाचे समांतर तपासात चौकशी केली असता, त्यांनी मालेगाव शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणांवरून एकूण ०७ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांचे कब्जातून ०२ हिरो सी.डी. डॉन, ०१ हिरो पेंशन प्रो, ०१ होन्डा युनिकॉर्न, ०१ होन्डा शाईन, ०१ विकांत व्ही-१२, ०१ हिरो सुपर स्प्लेंडर अशा एकुण ०७ चोरीच्या मोटर सायकल किं. रू. ३,४०,०००/- रूपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीतांनी कबुली दिल्यावरून आयशानगर व रमजानपुरा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे ०२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर आरोपीतांना आयशानगर पोलीस ठाणेकडील गुरनं ७३/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) या गुन्हयात हजर करण्यात आले असून पुढील तपास आयशानगर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गेल्या दोन दिवसात मालेगाव शहरातून एकूण १८ चोरीच्या मोटर सायकल हस्तगत केल्या असून यातील आरोपीतांकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नागरीकांना आवाहन :-
सदर कारवाई मध्ये जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या मोटर सायकल हया आयशानगर पोलीस ठाणेस हजर करण्यात आलेल्या आहे. मालेगाव शहर व ग्रामीण भागातील ज्या नागरीकांच्या मोटर सायकल चोरीस गेलेल्या आहेत, त्यांनी आपले दुचाकीचे कागदपत्र घेवुन, आपले चोरीस गेलेले दुचाकीची खात्री करून आयशानगर पोलीस ठाणेस संपर्क करावा. तसेच नागरीकांनी यापुढे कोणतीही जुनी मोटर सायकल खरेदी करतांना मोटर सायकलचे मुळ कागदपत्रांची पडताळणी करूनच दुचाकी खरेदी करावी, तसेच कोणीही संशयीत कमी किंमतीचे दरात विना नंबरप्लेट अथवा बनावट नंबर प्लेट लावुन मोटर सायकल विक्री करण्यास आला, तर तात्काळ पोलीसांशी संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध