Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ मे, २०२६

दिंडोरी येथील के.व्ही.एन.नाईक विद्यालयाला मदत.




बापू चव्हाण दिंडोरी

    दिंडोरी शहरातील के.व्ही.एन. नाईक विद्यालयाला उद्योजक अजित पटवा यांनी १ मे महाराष्ट्र दिन या दिवशी ३१ हजार रुपयांचा मदतीचा हात देऊन चेक दिला. 
       प्रथमतः संस्थेचे संचालक शरद बोडके यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अजित पटवा विद्यालयाचे प्रा.राजेंद्र सांगळे उपप्राचार्य सुनील उगले प्रा.शिवाजी साबळे प्रा.अरविंद केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर अजित पटवा यांचाही सत्कार करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.
       याशिवाय विद्यालयांमध्ये अकरावी वर्गामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता आव्हाड यांनी केले.तर आभार प्रा.योगिता ढाकणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध