Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ९ मे, २०२६

दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षपदी आशा कराटे बिनविरोध



                                                                   बापू चव्हाण दिंडोरी :-

         दिंडोरी नगरपंचायतीच्या नगरसेविका आशा कराटे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.भाजपच्या नगरसेविका आशा कराटे यांची नगराध्यक्षपदी प्रथम निवड झाल्याने महायुतीच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 
        दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुनीता लहांगे यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपद रिक्त झाले होते.या पदासाठी नगरसेविका आशा कराटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.आज नगरपंचायत कार्यालयामध्ये तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.आशा कराटे यांच्या अर्जाला सूचक म्हणून नगरसेविका निर्मला मवाळ होत्या तर अनुमोदक नगरसेविका अरुणा देशमुख होत्या.दुसरा कोणताही अर्ज नसल्याने आशा कराटे यांची नगराध्यक्षपदी निवड बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांनी घोषित केले. 
        यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,मंडल अध्यक्ष शाम मुरकूटे,महामंत्री रणजित देशमुख, योगेश तिडके,मंडल अध्यक्ष शाम मुरकूटे,मंदा गायकवाड,शहराध्यक्ष तुषार घोरपडे आदींसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुध्दा जोरदार घोषणाबाजी करत आशा कराटे यांचे अभिनंदन केले.

चौकट

           दिंडोरी नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी मला बिनविरोध निवडून दिले,त्यांचा विश्‍वास मी सार्थ ठरवेल.अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ,माजी आमदार रामदास चारोस्कर,माजी आमदार धनराज महाले,भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम उभे करु.नगराध्यक्षांच्या वाटचालित ज्येष्ठ नेते शिवाजी पिंगळ,विवेक कुलकर्णी,चंद्रकांत राजे,प्रमोद देशमुख,राष्ट्रवादीचे गटनेते अविनाश जाधव,विलासनाना देशमुख यांनी शब्द पाळून सहकार्य केले व शब्द पाळला. मुरकूटे,रणजित देशमुख,अ‍ॅड.प्रदीप घोरपडे,सचिन देशमुख,कैलास मवाळ,रमेश बोरस्ते यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांची मोलाची साथ मिळाली.या पुढील काळात शहराच्या विकासाला प्राधान्य देवू व सामान्य जनतेचा जीवनस्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करु. 
    आशा कराटे, नगराध्यक्षा 
 (दिंडोरी नगरपंचायत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध