Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ मे, २०२६
“ड्युटीत कसूर करणाऱ्यांना थेट घरचा रस्ता!” कारवाईनंतर पोलीस दलात भीतीचं वातावरण
जळगाव प्रतिनिधी :- जळगाव पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर आलीय. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा करणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांना तात्काळ निलंबित करण्याची कठोर कारवाई केली आहे. सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत अशी निलंबन करण्यात आलेल्या दोन अंमलदारांची नावे असून या धडक कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (८ मे) रात्री सुमारे ९:२० वाजताच्या सुमारास राखीव पोलीस निरीक्षकांनी जळगाव पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्यावरील गार्ड ड्युटीची (सुरक्षा रक्षक) अचानक पाहणी केली. या तपासणी दरम्यान गार्ड ड्युटीवर तैनात असलेले संभाजी पाटील आणि प्रदीप राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित नसून गायब असल्याचे समोर आले
राखीव पोलीस निरीक्षकांनी गार्ड रूमची कसून झडती घेतली असता, तिथे सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या ३ एस.एल.आर. (SLR) रायफल्सपैकी एक रायफल (बट नं. ८२.२६२.८८२) अत्यंत हलगर्जीपणाने आणि कोणतीही सुरक्षितता न बाळगता बेवारस स्थितीत आढळून आली. आश्चर्याची बाब म्हणजे या शासकीय रायफलमध्ये कोणताही दारूगोळा नव्हता. पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे शस्त्र उघड्यावर टाकून ड्युटीवरून पळून जाणे ही बाब सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेतली.
पोलीस प्रशासनाने या प्रकाराला महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन मानले आहे. त्यानुसार जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी संबंधित दोन्ही अंमलदारांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. निलंबन कालावधीत दोन्ही कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय जळगाव येथेच राहणार असून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा