Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १ जून, २०२६
Home
/
/
१५० वर्षे जुनी शाळा इमारत धोकादायक; नवीन इमारतीसाठी शिक्षण मंत्र्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
१५० वर्षे जुनी शाळा इमारत धोकादायक; नवीन इमारतीसाठी शिक्षण मंत्र्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
चिमठाणे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) : चिमठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ ची सुमारे १५० वर्षे जुनी इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून ती तात्काळ पाडून नवीन शाळा इमारत उभारावी, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सदर शाळेची स्थापना १ ऑगस्ट १८६५ रोजी झाली असून या परिसरातील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेच्या इमारतीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून छतही कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या दुरवस्थेबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. संबंधित अधिकारी पाहणीसाठी येतात, छायाचित्रे काढून जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. इमारत दुरुस्तीयोग्य नसून नवीन बांधकाम हाच एकमेव पर्याय असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जुन्या इमारतीचे पाडकाम करावे, नवीन शाळा इमारतीस प्रशासकीय व आर्थिक मंजुरी द्यावी तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून बांधकामाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“शिक्षण हीच मुलांच्या उज्ज्वल भविषाची पायाभरणी आहे. मात्र, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून नवीन शाळा इमारतीचे काम हाती घ्यावे,” अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा