Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ जून, २०२६
Home
/
/
वादळी वाऱ्यासह दिंडोरी तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड विद्युत पुरवठा ही खंडित.
वादळी वाऱ्यासह दिंडोरी तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड विद्युत पुरवठा ही खंडित.
बापू चव्हाण दिंडोरी
गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांना असह्य करणारा उष्णतेमुळे निर्माण झालेला उकाडा सुरू असताना आज मंगळवार दि.२ जून रोजी तीन ते चार वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यात वादळी पावसाने अचानक दमदार बॅटिंग केल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना धक्का दिला.त्यामुळे नागरिकांना थोड्या प्रमाणात का होईना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
दुपारनंतर हवामानात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार बॅटिंग केल्याने या पावसामुळे दिंडोरी बाजारपेठत व्यापारी वर्गाची व नागरिकांची धावपळ पहावयास मिळाली तालुक्यात काही ठिकाणी या वादळी पावसाचा जोरदार फटका बसला त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्या घरांची पत्रे ही उडून गेले तर काही ठिकाणी रस्त्यांवर झाडांच्या मोठमोठ्या फांट्या तुटून पडल्या त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता मात्र नागरिकांनी पाऊस कमी होताच पडलेल्या फांद्या रस्त्यातून बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला याशिवाय विद्युत पुरवठाही गुल झाल्याने उशिरापर्यंत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज जोडणीचे व दुरुस्तीचे काम करून खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करीत होते.
मात्र असे असले तरी तालुक्यात झालेल्या पावसामुळे थोड्या प्रमाणात नागरिकांमध्ये थंड वातावरणाचा दिलासा मिळाला तर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहावयास मिळाले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा