Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ४ जून, २०२६

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर गायत्री पाटीलचे यश; M.Com अंतिम वर्षात A+ श्रेणीत उत्तीर्ण



चोपडा, प्रतिनिधी : चोपडा तालुक्यातील घोडगाव परिसरातील कुसांबा येथील रहिवासी तथा गुलाबराव साहेबराव पाटील यांची नात आणि शिरपूर तालुक्यातील करवंद येथील कै. सुभाष पाटील यांची कन्या कु. गायत्री पाटील हिने आर. सी. पटेल महाविद्यालयातून M.Com अंतिम वर्षाची परीक्षा A+ श्रेणीत उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

गायत्रीच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर तिच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मजुरी करून मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या संघर्षाची जाणीव ठेवून गायत्रीने जिद्द, चिकाटी आणि कठोर अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. तिच्या यशामुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग तसेच मामाच्या गावातील राहुल पाटील, योगेश पाटील, कृषिमित्र दीपक बुवा, पीएसआय स्वप्नील कोळी, डॉ. महेंद्र कोळी, सैनिक ज्ञानेश्वर पाटील, समाधान मोरे, निर्मल रजाले, भूषण पटेल, प्रमोद कोळी, चेतन सोनवणे, विलासराव सोनवणे, गोविंदा करणकाळे, दिनेश सोनवणे, पंकज शिरसाठ, सूर्यभान कोळी, पंकज पटेल, संदीप बोरसे, लोटन कोळी आणि सागर पटेल आदींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
गायत्रीने भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात तसेच जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश संपादन करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध