Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ जुलै, २०२६
अवैध धंद्यांविरोधात शेळगाव ग्रामसभेचा एकमुखी ठराव मंजूर...
परंडा, (राहूल शिंदे)दि.१७ – तालुक्यातील शेळगाव येथे सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत प्रशासक सुलोचना विष्णू शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत शेळगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेळगाव, माणिकनगर, लोणारवाडी व काळेवाडी येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, मटका तसेच मावा-गुटखा विक्रीविरोधात एकमुखाने आवाज उठवत संबंधित व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेत किशोर शिवाजी मोरे यांनी ठराव मांडताना गावामध्ये अवैध धंद्यांमुळे शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा धोक्यात येत असून, विशेषतः तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे गावातील सर्व प्रकारचे अवैध व मानवी आरोग्यास व जीवितास घातक असलेले व्यवसाय तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, तसेच हा ठराव वरिष्ठ प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
या ठरावास ज्ञानेश्वर नवनाथ मगर यांनी अनुमोदन दिले. सविस्तर चर्चेनंतर ग्रामसभेने हा ठराव बहुमताने मंजूर केला.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय गरड, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह सुभाषराव मोरे तसेच गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामसभेचा ठराव व निवेदन पुढील कार्यवाहीसाठी आंबी पोलीस स्टेशन येथे सादर करण्यात आले असून, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह मोरे यांनीही यासंदर्भातील स्वतंत्र निवेदन जिल्हाधिकारी, धाराशिव यांना देऊन अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची वेळ आली आहे" – अमर मोरे
"शेळगाव ग्रामपंचायत हद्दीतील अवैध दारू विक्री, मटका, मावा-गुटखा यांसारखे बेकायदेशीर व्यवसाय गावाच्या सामाजिक स्वास्थ्याला घातक ठरत आहेत. यामुळे युवक व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. ग्रामसभेने लोकशाही मार्गाने बहुमताने ठराव मंजूर केला असून हा जनतेचा आवाज आहे. या ठरावाची अंमलबजावणी करून संबंधितांवर तातडीने व कठोर कारवाई व्हावी, अशी आमची जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे. शेळगाव व शेळगाव जि. प गट व्यसनमुक्त आणि गुन्हेमुक्त करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत."
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा