Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६
मुख्याध्यापिकेसह तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा; प्रवेश नाकारल्याचा व जातीय अपमानाचा आरोप
साक्री प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गंगामाता माध्यमिक विद्यालय, म्हसदी येथील मुख्याध्यापिकेसह तिघांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0231/2026 दाखल करण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
फिर्यादी दावल भडू वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आपल्या नातीच्या शाळेतील प्रवेशासाठी ते गंगामाता माध्यमिक विद्यालयात गेले होते. त्यावेळी शाळेतील जबाबदार व्यक्तींनी प्रवेश देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर मुख्याध्यापिका व इतर संबंधितांनी जातीय स्वरूपाची अवमानकारक भाषा वापरत अपमान केल्याचा, धमकावल्याचा तसेच अनुसूचित जातीतील असल्यामुळे भेदभाव केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही संबंधित विद्यार्थिनीला प्रवेश देण्यात आला नाही. वारंवार शाळेत जाऊन विनंती केल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट अपमानास्पद वागणूक देत धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संबंधित कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे.
या तक्रारीची दखल घेत साक्री पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 351(2) व 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
एफआयआरनुसार खालील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे :
नरेंद्र आत्माराम देवरे
राजेंद्र आत्माराम देवरे
वर्षा नरेंद्र देवरे
पोलीस तपास सुरू
या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सुधीर भीमराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असून, सर्व संबंधितांचे जबाब नोंदविणे, पुरावे संकलित करणे व घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
दरम्यान, शाळेत विद्यार्थ्याला प्रवेश नाकारल्याचा तसेच जातीय अपमान केल्याचा आरोप झाल्यामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, तपासातून सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा