Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

वणीमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा; आदिवासी समाजाच्या हक्क व अस्मितेचा जागर



संदीप अवधूत :-
वणी : जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणी शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि अस्मिता यांचे दर्शन घडवत हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. पारंपरिक नृत्य, गीत, ढोल-ताशांचा गजर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला व संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच नव्या पिढीने शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आदिवासी समाजाचा जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेला पारंपरिक संबंध, निसर्गसंवर्धनातील योगदान आणि सामाजिक-सांस्कृतिक वारसा यावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात विविध परिसरातील पारंपरिक नृत्यही रॅली दरम्यान सादर करण्यात
“आदिवासी संस्कृतीचा अभिमान, हक्कांचे संरक्षण आणि सर्वांगीण विकास” या भावनेतून वणीमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलासराव कड, ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे, कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती प्रशांत, कड, सागर चौधरी, युवा नेते गोकुळ झिरवाळ ग्रामपंचायत अधिकारी भाऊसाहेब देशमुख ,पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पाटील 
पोलीस निरीक्षक कारभारी नांगरे,पोलीस हवालदार महेंद्र बागल,पोलीस हवालदार किशोर खराटे, पोलीस हवालदार सचिन पिंगळ, पोलीस हवालदार मनोज बोराळे, वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी,होमगार्ड, तसेच सर्व समजबांधव, इत्यादी च्या प्रयत्नाने कार्यक्रम उत्सवात पार पडला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध