Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

इन्फोसिस फाउंडेशनतर्फे पांढरेवाडी येथील विद्यार्थ्यांना ४० किटचे वाटप

तरुण गर्जना | प्रतिनिधी

परंडा दि. १५. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत इन्फोसिस फाउंडेशन सेवा सहयोग, पुणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅगच्या एकूण ४० किटचे वाटप करण्यात आले. गणेश आटुळे यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळालेल्या या शैक्षणिक मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. सामाजिक संस्थांनी व दानशूर व्यक्तींनी शिक्षणाच्या क्षेत्रात पुढाकार घेण्याची गरज यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शिवनकर, शिक्षक कांबळे, सुरेश मेंगाळ, भगवान खटके, गोकुळ भिलारे, माजी जि.प. सदस्य शिवाजी पवार, शरद नरके, आप्पा भिलारे, पद्माकर मोकाशे, दौलत भरणे, तानाजी हाडगळे, पोपट टिटवे, काका पवार व प्रविण आटुळे आदी उपस्थित होते.

शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅगच्या ४० किटचे वाटप हा केवळ साहित्य वितरणाचा उपक्रम नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध