Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांना स्वातंत्र्य दिनी "स्वातंत्र्य गौरव भूषण पुरस्कार प्रदान"..
सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांना स्वातंत्र्य दिनी "स्वातंत्र्य गौरव भूषण पुरस्कार प्रदान"..
दिंडोरी :- समाजसेवेच्या क्षेत्रात निरपेक्ष भावनेने कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांना यंदाचा मानाचा स्वातंत्र्य गौरव भूषण पुरस्कार जाहीर होऊन नुकताच त्यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपले मानवाधिकार फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात बापू चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीच्या क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती.
असे आहे कार्य
बापू चव्हाण यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब, वंचित घटकांसाठी सातत्याने काम केले आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, पत्रकारिता आणि युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता ते अविरतपणे समाजसेवेत सक्रिय आहेत.
"पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती"
या पुरस्कार वितरण सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपले मानवाधिकार फाउंडेशन चे संचालक तथा शिव -संविधान व्याख्याते डॉ दीपेश पस्टे या मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन बापू चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
प्रतिक्रिया
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात बापू चव्हाण म्हणाले, "हा पुरस्कार माझा नसून, माझ्यावर विश्वास ठेवून साथ देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि समाजाचा आहे. यापुढेही समाजसेवेचे व्रत असेच सुरू ठेवणार आहे."
त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा