Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

नगरसेवक श्री दिनकर आण्णा पाटील व भाजप नाशिक शहर अध्यक्ष श्री सुनील केदार यांच्या सह भोईसमाज युवा मंच ची बळी मंदिर अपघातप्रकरणी दोषी मालट्रक चालकावर कठोर कारवाईची मागणी



नाशिक प्रतिनिधी : बळी महाराज मंदिर परिसरातील बळी मंदिर उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघाताची तातडीने चौकशी करून दोषी मालट्रक चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक श्री दिनकर आण्णा पाटील व भाजप नाशिक शहर अध्यक्ष श्री सुनील केदार सह भोईसमाज युवा मंच, नाशिकच्या वतीने पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिनांक 27 जुलै 2027 रोजी नाशिक येथील बळी मंदिर उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात भोईसमाज युवा मंच, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. तुषार सोमनाथ साटोटे यांच्या मातोश्री सौ. (कै.) उषा सोमनाथ साटोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधित मालट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, घटनेला 19 दिवस उलटूनही त्याचा शोध लागलेला नसल्याने निवेदन देण्यात आले आहे.

अपघातानंतर संबंधित चालकाचा शोध घेण्यासाठी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात यावी, तसेच बळी मंदिर उड्डाणपूल व परिसरातील सर्व सरकारी व खासगी सीसीटीव्ही फुटेज तपासून मालट्रक व चालकाचा शोध घ्यावा, अशी मागणी भोई समाज युवा मंचाने केली आहे.

तसेच निष्काळजीपणे वाहन चालवून एका निरपराध महिलेचा जीव घेणाऱ्या अज्ञात चालकाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणासंदर्भात पोलिस ठाण्यात दाखल एफआयआर/तक्रारीची प्रत, शवविच्छेदन अहवालाची प्रत तसेच अंत्यविधीच्या ओळखपत्राची प्रत निवेदनासोबत जोडण्यात आली आहे.

भोईसमाज युवा मंचचे जिल्हाध्यक्ष श्री. निलेश रतन शिवदे यांनी हे निवेदन सादर केले असून, संबंधित तपास अधिकाऱ्यांना अज्ञात मालट्रक चालकाचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध