Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

अभोणा पोलीस स्टेशन हद्दीत मटक्याचा सुळसुळाट; अभोणा पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे बहरले.?





अभोणा (कळवण) | प्रतिनिधी
कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारी अभोणा पोलीस स्टेशनची हद्द आज मटका, जुगार आणि अवैध धंद्यांचे माहेरघर बनली आहे. दिवसाढवळ्या अभोणा कनाशी, जयदर ,या ठिकाणी आणि काही हॉटेलांच्या आडोशाला राजरोसपणे मोबाईल द्वारे मटका चालतोय आणि पोलीस मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसले आहेत, असा संतप्त सवाल येथील सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि स्थानिक नागरिकांच्या उघड आरोपानुसार, हा सर्व प्रकार एकट्या दुकट्या मटकावाल्याचा नसून यामागे थेट पोलीस स्टेशनमधील अधिकारी यांचा वरदहस्त असल्याची जोरदार चर्चा आहे. लक्ष्मी दर्शन घेऊन या अवैध धंद्यांना अभय दिले जात असल्याने तरुण पिढी बरबाद होत आहे.
        तरुण पिढी बरबादीच्या खाईत
अभोणा, कनाशी जयदर परिसरात सकाळ संध्याकाळ मटका पर्ची लिहिणाऱ्यांची गर्दी दिसते. रोजमजुरी करणारा गरीब वर्ग, शेतकरी आणि विद्यार्थीही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. घरातील कष्टाचा पैसा मटक्याच्या आकड्यात घालून अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. चोऱ्या, भांडणे आणि कौटुंबिक कलह वाढण्यास हेच कारणीभूत आहे.अशी उघड चर्चा नागरिकांमध्ये आहे पोलीस अधीक्षक या अवैध धंद्याना कायद्याचा धाक दाखवून गोरगरीब जनतेला न्याय देतील व अवैध धंद्याना समर्थन करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करतील हा नागरिकांचा सदृढ विश्वास आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध