Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६
मजुरीच्या पैशांच्या वादातून गोळशी येथे युवकाचा खून,दिंडोरी पोलिसांकडून दोघांना अटक.
बापू चव्हाण दिंडोरी:-
मजुरीचे पैसे दिले नाहीत या रागातून एका २९ वर्षीय तरुणाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे घडली आहे.
योगेश रघुनाथ लहांगे (वय २९, रा.गोळशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.फिर्यादी अशोक रघुनाथ लहांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,१७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता मजुरीच्या पैशांच्या देण्याघेण्यावरून वाद झाला. यावरून संशयित आरोपी अशोक म्हसु गायकवाड (वय ४२, रा. गोळशी) आणि किशोर हरी गांगोडे (वय ४४,रा.फोपळवाडे) यांनी संगणमत करून योगेशच्या डोक्यात धारदार हत्याराने तीन जबर वार केले.
घटनेनंतर आरोपी किशोर याने योगेश दारू पिऊन पडल्याचा बनाव रचला.मात्र,कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता योगेश गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्यास तातडीने उमराळे आरोग्य केंद्रात व नंतर आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले;परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार, अल्ताफ शेख,हरिश्चंद्र पाडवी, प्रदीप शिंदे व पथक या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
-
क्रांती झाली आणि भारतात जनता आनंदी झाली. इंग्रज देश सोडून गेलीत? का तर भारतीय जनता ब्रिटिशशाई विरोधात एकवटली होती. जनता स्वराज्य सुराज्य जे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा