Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहाला ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह’ नाव देण्याची शिफारस.



बापू चव्हाण नाशिक

     नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील प्रमुख सभागृहास ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह’असे नाव देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते व मविप्र समाज संस्थेचे संचालक प्रवीण जाधव यांनी मंत्री महोदय यांच्याकडे केली होती.
        या मागणीला अनुसरून नामदार नरहरी झिरवाळ यांनी लेखी पत्राव्दारे नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहास कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव देण्याची शिफारस करण्यात आली आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे शिफारस केली आहे.नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक व ग्रामीण विकासाच्या इतिहासात कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे योगदान मोलाचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण पोहोचविणे,समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणे तसेच शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले आहे.
        नाशिक जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत ही जिल्ह्याच्या विकासाचे महत्त्वाचे केंद्र असून,या इमारतीतील प्रमुख सभागृहास कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासोबतच भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल,अशी भूमिका पत्रातून मांडण्यात आली आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या वतीनेही या नामकरणासाठी निवेदन प्राप्त झाले असल्याचे पत्रात नमूद आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील प्रमुख सभागृहास ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह’ असे नाव देण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.
या शिफारसीमुळे कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याचा उचित गौरव होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध