Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

दिंडोरीत एक राखी जवानों के नाम शहिदांना मानवंदना.




बापू चव्हाण दिंडोरी :-
    दिंडोरी येथील शहीद प्रसाद क्षीरसागर स्मारक येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित एक राखी जवानों के नाम'या सगळ्या- वेगळ्या उपक्रमांतर्गत भावपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.
 ‌‌ यावेळी प्रतिष्ठानचे मयूर चोळके व त्यांची संपूर्ण टीम ही शहीद स्मारकावर येथे येऊन त्यांनी शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या कार्याचे स्मरण करून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली व मानवंदना दिली.यावेळी बोलताना मयूर चोळके म्हणाले,गेल्या पाच वर्षांपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून राख्या गोळा करून सीमेवर,विशेषतः कारगिल,लेह-लडाख सारख्या दुर्गम भागातील जवानांना पाठवतो.जवानांना बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी,हा एकच हेतू आहे.हे आमचे कर्तव्यच आहे असे त्यांनी सांगितले.
      याप्रसंगी शहीदाच्या वीर माता निर्माता मंजुषा क्षीरसागर वीर बंधू-भगिनी,तसेच दिंडोरी तालुका माजी सैनिक परिवार संघटनेचे अध्यक्ष भारत खांदवे,दत्तात्रय जाधव,काशिनाथ वडजे संगीता घिवंडे,संगीता कतवारे,बबीताई ढगे,राज धारीवाल,कविता बैरागी, संध्या निरगुडे अदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
      यावेळी भारत खांदवे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या 'एक राखी जवानों के नाम' या राष्ट्रभक्तीपर कार्याचे मनापासून कौतुक केले व आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध