Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ ऑगस्ट, २०२६
देशात पुरेसा साखर साठा असताना दरवाढ आश्चर्यकारक
बापू चव्हाण दिंडोरी
देशामध्ये मुबलक साखर असून सुद्धा मोठ्या प्रमाणात साखरेचे भाव वाढत असल्यामुळे यात मोठ्या प्रमाणात साठेबाजी करून ठेवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे वक्तव्य कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी वाढलेल्या साखर बाजारभाव बद्दल बोलताना केले.
यावेळी श्रीराम शेटे पुढे म्हणाले की,भारत देशामध्ये साखरेबाबत अतिशय सुंदर नियोजन असून वर्षभर पुरेल इतकी साखर कशी साठवता येईल नवे नवे त्यापेक्षाही जास्तीची साखर आपल्या देशामध्ये कायमच उपलब्ध असते इतके सुंदर धोरण भारता व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशांमध्ये दिसत नाही. आजही सर्वच सहकारी साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर शिल्लक असून बफर साठाही शिल्लक आहे. मात्र सध्या साखरेचे दर भूतो न भविष्यते असे गगनाला भिडल्यामुळे यात साठेबाजी होते की काय अशी शंका निर्माण होताना दिसत आहे.
यातच जर सरकारने साखरेच्या आयातीबाबत किंवा अन्य धोरण स्वीकारले तर अधिकची साखर आयात होऊन परिणामी बाजारभावावर त्याचा मोठा परिणाम होऊन साखरेचे भाव कोसळतील यामुळे साखर कारखाने परिणामी शेतकरी ही संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय सहकारी साखर कारखाना एकही पोते जास्त किंवा कमी साखर विकू शकत नाही या उद्योगावर पूर्णतः नियंत्रण सरकारचे आहे यामुळे साखर चा दर अचानक वाढणे हे नक्कीच शंका उत्पन्न करणारे आहे.
सरकारला साखरेचे उत्पादन खूप जास्त होईल असे वाटत असताना सरकार बी ग्रेड व रसापासून इथेनॉल निर्मिती करते मात्र जर उपलब्ध ऊस कमी झाला आणि साखरेचे उत्पादन कमी होईल असे वाटत असल्यास सरकार केवळ सी ग्रेड साखरेपासूनच इथेनॉल निर्मितीला परवानगी देते आणि याचाही काही अडचण वाटली तर साखरेचे अधिकचे उत्पादन करण्यासाठी अथक प्रयत्न केले जाऊन परिणामी निर्यातही बंद केली जाते यामुळे वर्षभरापूर्वी या साखरेच्या बाबत कायमच नियोजन झालेले असते हे नियोजन आजकालचे नसल्यामुळे ते अचानक कोसळू शकत नाही यामुळे वाढते दर निश्चितच शंका उत्पन्न करणारे असे दिसते असे प्रतिपादन श्रीराम शेटे यांनी केले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा