Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

रिंगरोड बाधित महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखीअन्याय होणार नसल्याची फडणवीसांची ग्वाही.




बापू चव्हाण नाशिक

‌ रिंग रोड आणि पाथर्डी कचरा डेपो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या जमीन धारकांच्या प्रश्नावर शुक्रवार दिनांक २८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून औक्षण केले आमचा संसार शेती जमीन वाचवा असे भावनिक आवाहन करून साकडे यावेळी महिलांनी घातले. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी एकाही जमीन धारकावर अन्याय होणार नाही लवकरच मुंबईत बैठक घेऊन सर्व बाजूंच्या विचार केला जाईल अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.
        दिनांक २५ ऑगस्ट रोजी नाशिकहून मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू सुरू ठेवले होते दि.२७ ऑगस्टला पालकमंत्री गिरीश महाजन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अधिकाऱ्यांनी आंदोलना स्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यां सोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले.

येत्या तीन ते चार दिवसात मुंबईत मुख्यमंत्री संबंधित मंत्री सचिव जिल्हाधिकारी एम आय आर डी चे अधिकारी भूसंपादन व मूल्यांकन अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक देण्यात येणार आहे. 
करण गायकर 
(संपादक छावा क्रांतिवीर सेना)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध