Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६
चारोसे येथे भरपावसात स्वाध्याय परिवाराचा रक्षाबंधन सोहळा
बापू चव्हाण नाशिक
आपण पहिले माणूस आहोत.आदिवासी की वनवासी, हा नावाचा वाद निरर्थक आहे. वनात राहतात म्हणून वनवासी म्हटले जाते.त्याचा वेगळा अर्थ कुणी काढू नये.आदिवासी, वनवासी बांधवांना भेटण्यासाठी आले याचा मला आनंद आहे.या भागात दादांनी केलेल्या कामामुळे लोक प्रभावित झाले आहेत. या भागाचा विकास व्हावा,जनतेचे जीवनमान सुधारावे,यासाठी स्वाध्याय परिवार काम करत आहे,’ असे प्रतिपादन धनश्री तळवलकर यांनी चारोसे येथे केले.
दिंडोरी तालुक्यातील चारोसे येथे स्वाध्याय परिवाराच्या वतीने रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला.भरपावसात चिखल-मातीत हजारो स्वाध्यायी शिस्तबद्धपणे बसून धनश्री तळवलकर यांचे विचार ऐकत होते. मुख्य कार्यक्रम सुरू होताच पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला.
‘देव आणि माणूस यांच्यातील नाते हे अतूट आहे.देव केवळ मंदिरात नसतो,तर प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा अंश आहे.त्यामुळे माणसामाणसांमध्ये भेद करण्याऐवजी प्रत्येकाकडे आपलेपणाने पाहिले पाहिजे. दुसऱ्याच्या सुख-दुःखाशी जोडले जाणे,त्याच्या जीवनात आनंद निर्माण करणे,हीच खरी देवाची उपासना आहे,’असा विचार तळवलकर यांनी मांडला.
‘माणूस आज आपली नाती विसरत चालला आहे.कुठल्याही महिलेला स्वतःच्या रक्षणासाठी राखी बांधण्याची गरज का भासावी? कारण समाज बिघडत चालला आहे.सुरक्षित समाजाची गरज आहे.व्यसनाधीनता कमी करण्याची गरज आहे.रक्षाबंधन हा आपला दिवस आहे;त्यामुळे आपण आपल्या भावाला बदलले पाहिजे.केवळ राखी बांधून जबाबदारी संपत नाही,तर त्या नात्यातील प्रेम,विश्वास आणि जबाबदारी कृतीतून जपली पाहिजे,’असे आवाहन त्यांनी केले.
स्वाध्याय म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हे,तर स्वतःकडे पाहण्याची आणि समाजाशी असलेले नाते जाणून घेण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.‘आपल्यामध्ये देव आहे आणि समोरच्यामध्येही देव आहे,’ हा भाव निर्माण झाला तर समाजातील भेद,अहंकार आणि दुरावा कमी होऊन माणुसकीचे नाते अधिक घट्ट होईल,असा संदेश त्यांनी दिला.
आदिवासी बांधवांनी सांगितल्या परिवर्तनाच्या कथा
स्वाध्याय परिवारामुळे आपल्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांच्या अनुभवकथा आदिवासी बांधवांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडल्या. स्वाध्यायाच्या माध्यमातून जीवनशैलीत बदल,व्यसनांपासून दूर जाणे आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाल्याचे अनुभव त्यांनी कथन केले.
रस्त्यांचे खड्डेही भरले
चारोसे गावाला जोडणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे स्वाध्याय परिवारातील कार्यकर्त्यांनी श्रमदानातून भरले.भरपावसातही कार्यकर्त्यांनी केलेल्या या कामातून सामाजिक बांधिलकी आणि शिस्तीचे दर्शन घडले.
कार्यक्रमावेळी मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार धनराज महाले यांच्यावतीने धनश्री तळवलकर यांचे स्वागत करण्यात आले.प्रतिकूल हवामान असतानाही हजारो स्वाध्यायींची उपस्थिती,शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांमुळे चारोसे येथील रक्षाबंधन सोहळा लक्षवेधी ठरला.दिंडोरी पेठ सुरगाणा आदी आदिवासी भागातील स्वाध्यायी यांची उपस्थिती लक्षनीय होती.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा