Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३० ऑगस्ट, २०२६

नाशिक महापौर हिमगौरी आहेर,- आडके यांच्या हस्ते माजी सैनिकांना रक्षाबं.




बापू चव्हाण दिंडोरी

       नाशिक येथील महापौरांच्या शासकीय निवासस्थानी रामायण बंगल्यावर अनोखा रक्षाबंधन सोहळा पार पडला. 
       देशाच्या सीमेवर देश सेवा करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी तसेच ऊन वारा आणि पावसाची परवा करता शहर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर - आडके यांच्या पुढाकाराने कृतज्ञता रक्षाबंधन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
     या अनोख्या कार्यक्रमांमध्ये महापौरांनी माजी सैनिक व स्वच्छता दूतांना स्वतः राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम केला. रक्षाबंधनाच्या पारंपारिक उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात माजी सैनिकांना व महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू व कृतज्ञता पत्र देऊन गौरव करण्यात आला. 
 ‌‌ यावेळी महापौर हिमगौरी आहेर- तिडके यांनी सांगितले की देशाच्या सीमेचे रक्षण करणारे वीर सैनिकांनी तसेच शहराचे आरोग्य व स्वच्छता जपणारे स्वच्छतादूत हे समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत समाज आणि महापालिका नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील असे सांगून त्यांच्या त्यागाला आणि अविरत सेवेला मानाचा मुजरा करण्यासाठी एका भगिनींच्या नात्याने कृतज्ञता रक्षाबंधन साजरे करण्याचा हा छोटासा प्रयत्न असून या मुळे माजी सैनिक आणि नागरिक यांच्यातील आपुलकीचा व आदराचा भाग अधिक घट्ट झाला असे सांगितले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध