Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

दिंडोरी बाजारपेठे राखी खरेदीसाठी लाडक्या बहिणींची गर्दी.




बापू चव्हाण दिंडोरी

      बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने दिंडोरी बाजारपेठा विविध रंगाच्या राख्यांनी सजल्या आहे.
       रक्षाबंधन आणि श्रावण उत्साहाच्या पार्श्वभूमीवर राख्या व भेटवस्तू खरेदीसाठी लाडक्या बहिणीची बाजारपेठेत मोठी लगबग पाहायला मिळत आहे.त्यामुळे बाजारपेठांमध्ये आर्थिक उलाढाल वाढली आहे. बाजारात पारंपारिक रेशमी धाग्यांपासून ते फॅन्सी, मोती, लटकन,कुंदन,आणि चांदीच्या राख्यांची मोठी विक्री होताना दिसत आहे.याशिवाय लहान मुलांसाठी आज आकर्षण म्हणून कार्टून,छोटाभीम,डोरेमॉन,लाईट असणाऱ्या राख्या,आणि पॉपइट राख्यांना विशेष मागणी दिसून येत आहे. 
     याशिवाय साड्या रेडिमेट कपडे बांगड्या मॅचिंग लेडीज साहित्याच्या दुकानांमध्ये देखील खरीदीदारांची गर्दी झाली आहे. मिठाईच्या दुकानांमध्ये पेढे बर्फी आणि विविध भेटवस्तूच्या खरेदीसाठी देखील महिलांची गर्दी पहावयास मिळत आहे.यामुळे दिंडोरीच्या मुख्य बाजारपेठेत आणि बस स्थानक परिसरात रस्त्यांवर दुकानांमध्ये गर्दीची रेलचेल सुरू असून स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मात्र एका बाजूला मुख्य रस्त्याने बाजारपेठेच्या परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.बदलत्या काळानुसार राख्यांचे स्वरूप बदलले असले तरी नात्यातील आपुलकी उत्साह तोच पाहायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध