Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६

त्रंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारात बनावट नोटा छापणारी टोळी अटकेत..





संदीप अवधूत :-
दि. १२/०८/२०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहीती नुसार तळेगाव शिवार, ता. त्रंबकेश्वर याठिकाणी हिरामण दाते यांच्या बंगल्यात काही इसम हे बनावट नोटा तयार करत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार तळेगाव शिवारातील हिरामण दाते यांचे बंगल्यावर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक शहर पोलीस व त्रंबकेश्वर पोलीस ठाणेचे पथकाने फॉरेन्सिक टिमसह छापा टाकला. सदर छापा कारवाई मध्ये खालील इसमांना ताब्यात घेण्यात आले.१) अमरेश्वर सुधाकर आईथा, वय ३७ वर्ष, रा. अनंर पेठ, प्रेमनगर, हैदराबाद, राज्य तेलंगणा.
२) दासहरी प्रसाद सत्यई, वय ३६ वर्ष, रा. गोल्लापल्ली, यल्लारेडडी, जि. सिरसाला, राज्य तेलंगणा ३) गोकुळ आनंदराव दाते, वय ५६ वर्ष, रा. सिध्दीपार्क, धृवनगर, गंगापुर रोड, नाशिक. मुळ रा. तळेगाव ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक.४) हिरामण पुंजा दाते, वय ५६ वर्ष, रा. तळेगाव गट नं. १०५ ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक.५) मच्छिंद्र भगवान घनदाट, घाटोळ गल्ली, सातपुर, नाशिक.सदर छापा कारवाईत वरील ताब्यात घेतलेले इसमांचे कब्जातुन ९,७५,०००/- रूपये रोख रक्कम त्यात ५०० रूपये दराच्या १९५० भारतीय चलनातील ख-या नोटा, को-या कागदांचे नोटांच्या आकाराचे बंडल, नोटा छापण्यासाठी लागणारे केमिकल, नोटा छापण्यासाठी लागणारी साधन सामुग्री, मोबाईल फोन, चारचाकी वाहन असा एकुण १२,१९,५८०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी हे अवैधरित्या त्यांचे स्वतःच्या आर्थिक फायद्यसाठी व फसवणुकीसाठी केमिकलच्या सहाय्याने मुळ ५०० रूपये दराच्या नोटेपासून ५०० रू. दराच्या बनावट नोटा तयार करतांना मिळुन आले असून त्यांचेविरूध्द त्रंबकेश्वर पोलीस ठाणेस गुरनं १४२/२०२६ भा.न्या.सं. कलम १७८,१८०,१८१,१८२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास त्रंबकेश्वर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध