Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६
मोहाडी व्याख्यानमालेचा समारोप पसायदान म्हणजे विश्वकल्याणाची प्रार्थना,इंद्रजित देशमुख
बापू चव्हाण नाशिक
संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची व्यापक संकल्पना मांडली आहे.पसायदानातील विश्वकल्याणाचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असून, तो केवळ पाठांतरापुरता न राहता आचरणात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख यांनी केले.
मोहाडी येथे ७१ व्या श्री अष्टबाहू गोपालकृष्ण प्रबोधन व्याख्यानमालेतील सातवे व समारोपाचे पुष्प ‘पसायदान’ या विषयावर बोलत होते.श्री अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी कै. एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन संयोजित या व्याख्यानमालेतील हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता म्हणून कै.भैय्यासाहेब श्रीराम जाधव यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले.
'पसायदान—आता विश्वात्मके देवे’ या विषयावर मार्गदर्शन करताना देशमुख यांनी पसायदानातील प्रत्येक ओवीचा जीवनाशी असलेला संबंध उलगडून सांगितला.संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली विश्वबंधुत्वाची भावना, दुष्ट प्रवृत्तींचे परिवर्तन,ज्ञानाचा प्रकाश आणि समाजातील परस्पर प्रेम यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक काळातील ताणतणाव, मतभेद आणि स्वार्थी प्रवृत्ती दूर करण्यासाठी संतविचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर होते. याप्रसंगी सह्याद्री अॅग्रो फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे,मविप्र संचालक शिवाजी गडाख, शालनताई सोनवणे, कवी संदीप जगताप, लक्ष्मण महाडिक,सुरेश कळमकर,अरुण सोनवणे, विष्णुपंत जाधव, देवराम जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गोपालकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाडमल्ल आणि कान्होबा यात्रेनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रबोधन व्याख्यानमालेतील सातही पुष्पांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.समारोपाच्या व्याख्यानात इंद्रजित देशमुख यांच्या प्रभावी व ओघवत्या शैलीतील विचारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचा शेवट सामूहिक पसायदान गायनाने झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. विलासराव देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी केले,तर आभार प्रा.धनंजय देशमुख यांनी मानले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा