Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ जून, २०१९

गोपाळपुरात सैतानालाही लाजवणारे दुष्कृत्य... 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 52 वर्षाच्या आरोपीकडून सलग तीन वेळा अनैसर्गिक अत्याचार


                (आरोपी गजानन पोरे )

प्रतिनिधी  (पंढरपूर) गोपाळपूर येथे एका माणसातील सैतानाने हैवानालासुध्दा लाजवेल असे दुष्कृत्य  केल्याची लाजिरवाणी घटना आज उघडकीस आली आहे. आज दि. 20-6-2019 रोजी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गोपाळपूरमधील सदर महिलेच्या शेजारी राहणार्‍या आरोपी गजानन पोरे याची नात सावी हिचेकडे खेळण्यासाठी आलेल्या एका 11 वर्षीय  अल्पवयीन मुलीचे तोंडास चिकपट्टी लावुन, डोळ्यास कापड बांधुन, तिचे हात-पाय साखळीने बांधुन तिचेवर आरोपी गजानन पोरे (वय 52) याने जबरी अनैसर्गिक अत्याचार केला.

या फिर्यादीवरुन पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात भादवि संक 376, 377 बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12, 42 प्रमाणे आरोपी गजानन पोरे, रा. गोपाळपूर, ता.पंढरपूर याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील आरोपी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत आहेत. आरोपीस उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीवर 376 लैगिक अत्याचार 377 अ-नैसर्गिक अत्याचार  POCSO  पोस्को Precaution of Child from Sexual Offences ­ct (लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम) कलमे लावण्यात आली आहेत.

पंढरपूर तालुका येथे घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी 1. पो. हवा. ढवळे, पो. ना. पवार 2. पो. हवा. चव्हाण, पो.ना. कोष्टी 3.पो. हवा. बंने, पो. ना. मोरे अशी तिन पथके तयार करून शोधासाठी रवाना केली होती. दरम्यान आरोपी हा तुंगत स्टँड वर आहे अशी माहिती समजल्याने पो. हवा. चव्हाण आणी कोष्टी यांना पाठवले असता आरोपीवर छापा घालुन  शिताफीने पकडले. फिर्यादी आणी त्यांची मुलगी च्या सहानुभूतीमुळे पोलीस ठाणे येथे गोपाळपुर येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर जमले होते, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी संयमाने परिस्थिती हाताळली.

आरोपीचे वय वर्ष 52 असुन साखर कारखान्याच्या वाहनावर चालक आहे. घटना घडल्या नंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने पोलीस कुमकसह घटनास्थळी गोपाळपुर येथे धाव घेतली. घटना 10, 11 आणी 12 या तारखेस तिन वेळा घडली आहे.  तक्रार द्यायची किंवा नाही या द्विधा मन:स्थितीमध्ये आणि  समाजामध्ये चर्चा होईल या भीतीने उशिरा तक्रार दिली असल्याची माहिती मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध