रावेर प्रतिनिधी (अजीज शेख)
जिल्हा करोसीन मुक्त झाल्याने बेरोजगार झालेल्या तालुक्यातील केरोसीन विक्रेते व हाॅकर्स यांचे पुनर्वसन करावे या मागण्यांसाठी तालुका हाॅकर्स व रिटेल विक्रेता युनियन तर्फे येथील तहसिल कार्यालया समोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी आंदोलनकर्त्यां तर्फे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद केले आहे की, तालुक्यात गत २५ ते ३० वर्षांपासुन शासन मान्य दरात राॅकेलची किरकोळ विक्री करणारे परवाना धारक विक्रेते व हाॅकर्स आहेत.दरम्यान आॅक्टोंबर २०१८ पासुन शासनाने जळगाव जिल्ह्यात अचानक केरोसीन( राॅकेल) पुरवठा बंद केलेला आहे. तालुक्यातील वयस्कर झालेले केरोसीन विक्रेते व हाॅकर्स या मुळे बेरोजगार झालेले असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या बाबत सहानुभूती पुर्वक विचार होवुन शासनाने बेरोजगार झालेल्या विक्रेते व हाॅकर्स यांना मानधन द्यावे किंवा पुर्वी प्रमाणे केरोसीन चा पुरवठा करावा अशी मागणीही या निवेदनान्वये केलेली आहे.
निवेदनावर उपाध्यक्ष ईश्वर शिंदे, सचिव किशोर पाटील, सहसचिव रईसउद्दीन, भावलाल शिंदे, एकनाथ महाजन, अरुण शिंदे, शे.अत्लाफ, शफीउद्दीन, संगीताबाई कोळी, विनोद भोई, शेख शरीफ, चावदास महाजन, भिकन शेख आदिंच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा