Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ जून, २०१९

शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासनाच्या योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा- संजय निंबाळकर




नळदुर्ग: प्रतिनिधी (विशाल डुकरे)              शहर शिवसेनेकडून शेतकऱ्याच्या समस्याचे निरसन करण्यासाठी नळदुर्ग शहर शिवसेनेकडून शेतकरी मदत केंद्राचे तालुक्याचे नेते संजय मामा निंबाळकर, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, शहरप्रमुख संतोष पुदाले, युवासेना उप तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, सोशल मीडिया प्रमुख सुनील गव्हाणे, ग्राहक सरक्षण प्रमुख नेताजी महबोले, भाजपा युवा मोर्चा शहर प्रमुख श्रमिक पोतदार, भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख सुधीर पोतदार, भाजपा सरचिटणीस विशाल सर डुकरे, सागर हजारे, शिवसेना उपशहर प्रमुख शाम कानकधर, उमेश नाईक ई. च्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 



    यावेळी बोलताना संजय मामा निंबाळकर यांनी सांगितले केले की शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे यासाठी जिल्हाभर ही मोहीम राबविण्यात येणार असून. सर्व शिवसैनिकांनी व युतीच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेवून सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावे यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवुन द्यावे. तसेच शेतकऱ्यांच्या इतर समस्या उदा शेतकरी पेंशन योजना मिळत नसेल व पिक विम्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आशा समस्या असल्यास त्यासाठी प्रयत्न करावे, तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज मुक्ती मिळाली नाही किंवा इतर समस्या असतील अशांनी आपली नावे शिवसेना सोशल मीडिया प्रमुख सुनील गव्हाणे व भाजपा युवा मोर्चा प्रमुख श्रमिक पोतदार यांच्या कडे द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध