प्रतिनिधी :(राजू तडवी )
फैजपूर येथील तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने देशभरात राबिवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वीतेसाठी फूट पोलिसिंग करून फैजपूर वासीयांमध्ये जनजागृती केली.
१८ महाराष्ट्र बटालियन चे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे एन सी सी अधिकारी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपुत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले
यात बावन्न कडेट्स आणि एन सी सी अधिकारी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी सहभाग नोंदविला. रॅली दरम्यान ठिकठिकाणी स्वच्छतेचे महत्व आणि फायदे, आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी घ्यावयाची काळजी, आणि स्वछ भारत अभियानात सक्रिय पणे सामील होण्यासाठी आवाहन केले.
यासोबतच स्वच्छ भारत समर इंटर्नशिप साठी कडेट्स उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळ चे अध्यक्ष शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा डॉ एस के चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सर्व सन्मा पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, सुधीर पाटील, तोसिफ तडवी, महेश पाटील, दुर्गेश महाजन, संजय बाऱ्हे, यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा