Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ जून, २०१९

मधुस्नेह संस्था परिवारातर्फे यशस्वी विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न




प्रतिनिधी राजू तडवी फैजपूर

दि.२३ जून २०१९ रोजी मधुस्नेह संस्था परिवारातर्फे  रावेर मतदारसंघातील इयत्ता दहावी व बारावीत चांगल्या गुणांनी उत्तिर्ण यशस्वी विद्यार्थांचा   गुणगौरव सोहळा थाटात पार पडला .अध्यक्षपदी मधुस्नेह परिवाराचे प्रमुख मा.श्री .शिरीष मधुकरराव चौधरी होते .सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री .रवींद्रभैय्या पाटील ,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काॕग्रेस ,जळगाव .व मा.अॕड .श्री .संदीपभैय्या

 पाटील  ,जिल्हाध्यक्ष काॕग्रेस  कमिटी,जळगाव.होते विशेष उपस्थिती मा.श्री .राजू तडवी ,प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग मुंबई महानगरपालिका व मा.श्री .दिलीप सूर्यवंशी सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला .कार्यक्रमाच्या सुरुवातीला 

ईशस्तवन- कल्पना गावंडे , पंकज वानखेडे  व विद्यार्थिनी धनाजी नानाविद्यालय ,खिरोदा .यांनी केले .कार्यक्रमाचे 

प्रास्तविक-प्राचार्य डाॅ. पी.आर .चौधरी ,धनाजी नाना महाविद्यालय ,चौधरी यांनी केले त्यात त्यांनी कार्यक्रम आयोजना संदर्भातील भूमिका मांडली.


मनोगते

विद्यार्थी हार्दिक बेंडाळे- अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन केले.यशामध्ये आई-वडिल व शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे ,

विद्यार्थिनी कु.दर्शना चौधरी यांनी  मनोगतामध्ये  माझ्या यशामध्ये माझी शाळा धनाजी नाना विद्यालय ,खिरोदा येथिल शिक्षक यांनी ममतेने संस्कार दिले .वब।  शिरीषदादांसारखे संस्था चालक दुर्मिळ असतात .कारण विद्यार्थांच्या सर्वांगीन विकास व्हावा हा उदात्त हेतू  त्यांचा असतो .


मा.श्री .दिलिप सूर्यवंशी ,श्री .राजू तडवी ,रमजान गुरुजी ,संदीपभैय्या पाटील, रवींद्रभैय्या पाटील यांनी मनोगतामध्ये  दहावी बारावी नंतर खरे शिक्षण सूरु होते .ध्येय डोळ्यांत ठेवून नियोजन करा .सोशल मिडिया मध्ये गुंतू नका असा सल्ला दिला  अतिशय सूंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल शिरीषदादा यांचे कौतुक मान्यवरांनी करून विद्यार्थांना भावीकार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच 

हा परिसर शिक्षणाचा बाबतीत समृद्ध आहे त्याला 

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे निस्वार्थ प्रयत्न दडलेले आहेत .अध्यक्षिय समारोप करताना  भविष्यात कोणकोणते सेवाभावी कार्य करणार आहोत याची माहिती मा.शिरीषदादा यांनी दिली .व यशस्वी विद्यार्थांना शुभेच्छा व आशीर्वाद देऊन उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे   सूत्रसंचालन प्रा.जे.जी .ढोले,प्रा.मनिषा पाटील ,प्रा.हेमलता चौधरी ,प्रा.बी.आर.डोळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुस्नेह संस्था परिवाराचे सदस्य ,प्राचार्य ,मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले .सदर कार्यक्रमास सुरेखा पाटील जी.प.सदस्य चिनावल गट,सौ अरूणा चौधरी,राजेश वानखेडे,लीलाधर शेठ,माजी आमदार रमेश दादा चौधरी,तसेच अजित पाटील सचिव सातपुडा विकास मंडळ पाल,आर. एल.चौधरी,सुधाकर झोपे गोविंदा अतरदे,या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध