Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३ जुलै, २०१९

हतनूर धरणारे 12 दरवाज उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


तापी नदीवर अवलंबून असलेल्या दुष्काळी गावांतील पाणी योजनांना या पुराचा फायदा होणार आहे.


 

 

हतनूर धरणारे 12 दरवाज उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रतिनिधी (शिवाजी पारधी )3 जुलै : विदर्भ तसंच मध्य प्रदेशात तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरच्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण

 क्षमतेने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या 12 दरवाज्यांतून प्रति सेकंद 778 क्युसेक्स अर्थात 27 हजार क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलाय. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं खान्देशातील जळगावसह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आलाय.


गेल्या काही दिवसांपासून विदर्भ तसच मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पाणीपातळीत अडीच मीटरने तर तापी नदीच्या पाणीपातळीत अर्ध्या मीटरने वाढ झालीय. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ 

असल्यानं नदीपात्रात पाणी सोडल्यानं तापी नदीवर अवलंबून असलेल्या दुष्काळी गावांतील पाणी योजनांना या पुराचा फायदा होणार असल्याची माहिती हतनूरचे शाखा अभियंता एन.पी. महाजन यांनी दिलीय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध