शिरपूर - प्रतिनिधी (योगेश्वर मोरे )दाऊळ ता. शिंदखेडा येथे दिनांक २३ जुन ग्रामपंचायत सभागृह दाऊळ येथे कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे कृषि अधिकारी कार्यालय यांच्या तर्फे दाऊळ रानचे कृषि सहाय्यक श्री. डि. बी. भोई यांचे मार्फत
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत खरीप हंगाम सन २०१९-२० साठी खरीप पिकाचे खरीप ज्वारी वाण SPH 1635 व लिक्विड कोंन्सेसेरिया 100 मी. ली., खरीप मका वाण, उदय 8 किलो व लिक्विड
कोंन्सेसेरिया 100 मी. ली., धनपद्धतीने देशी कापुस लागवडी अंतर्गत 3 कि. AK-5 व लिक्विड कोंन्सेसेरिया प्रती शेतकरी/प्रती एकरी क्षेत्रासाठी प्रत्येक प्रकल्पात २५ लाभार्थीना वाटप करण्यात आले. व शेतकर्यांचे उत्पन्न वाढीबाबत मार्ग दर्शन करण्यात आले. शेतकर्यांना बिज प्रक्रिया महत्व समजावून संगितले. शेतकर्यांना जास्तीत जास्त बिज प्रक्रिया करण्यास आव्हान केले. सादर कार्यक्रम प्रसंगी
गावाचे सरपंच मा. सो. शोभाबाई दिलीप पवार उपसरपंच धनराज त्र्यंबक माळी व ग्रामपंचायतीचे सदस्य विजय पाटील प्रेमसिंग गिरासे सुशीला नाईक व ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते. व असेच वेळोवेळी मार्गदर्शन व्हावे या बद्दल शेतकर्यांनी अपेक्षा व्यक्त केली
(योगेश्वर मोरे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा